आज दि.29 जून रोजी बाणेर येथील,मुंबई-बंगलोर हायवेच्या पश्चिम भागातील असलेल्या वेग वेगळ्या सोसायटी ह्या विकासा पासून वंचीत आहेत अशी परिस्तिथी आहे ह्या मध्ये ग्रीन झोन सोसायटी,रोहन लेहेर सोसायटी,रिजन्सी,गुलमर्ग सोसायटी, पाईनवूड सोसायटी, विष्णू पुरम सोसायटी, अलक्क्रीटी सोसायटी,मोहननगर इत्यादी,ह्या भागात आमदार सौ.मेधाताई कुलकर्णी यांनी नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर व भाजपा पदाधिकारी, पुणे मनपाचे वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी यांना बरोबर घेऊन या भागात पाहणी दौरा केला व मिटिंग घेतली,नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या त्याच ठिकाणी अधिकारी यांना सूचना करून कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले,तसेच नागरिकांना आव्हान केले कामे झाली नाहीत तर आपण थेट माझ्याशी संपर्क साधा, आणि आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी नागरिकांना आपला मोबाईल नंबर दिला,कुठे कुठे अडचणी आहेत त्या जागेवर जाऊन पाहणी केली,या वेळी 24/7 च्या पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुरू असलेल्या 35 लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे ह्याची पाहणी करून या वेळी माहिती घेतली असता काम धिम्या गतीने सुरू आहे असे समजले असता पाणी पुरवठा खात्याचे मुख्य अभियंता श्री व्ही जी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली, व हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले,तसेच या भागात पुणे मनपा च्या ताब्यात असलेल्या अमेनिटी स्पेस च्या जागेची पाहणी करून ती जागा नागरिकांच्या इच्छेनुसार व नागरिकांना बरोबर घेऊन डेव्हलप करा असे नगरसेविका सौ ज्योती कळमकर यांना सुचवले,
हा स्पष्ट पणा व कामाचा धडाखा पाहून नागरीक समाधान वेक्त करत होते.









हा स्पष्ट पणा व कामाचा धडाखा पाहून नागरीक समाधान वेक्त करत होते.









Comments
Post a Comment