‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांच्या पालखीचे आज रविवारी दुपारी पुणे शहरात आगमन झाले. तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्याने शनिवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बोपोडी येथे आगमन झाले. यावेळी शहरवासीयांनी पालखीचे जोरदार स्वागत केले.महापालिकेने या ठिकाणी स्वागत कक्ष उभारला होता. महापौर मुक्ताताई टिळक,आमदार विजयजी काळे,, उपमहापौर डॉ. सिद्धार्थजी धेंडे,प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक विजय शेवाळे,नगरसेवक प्रकाश ढोरे,नगरसेविका,ज्योती कळमकर,स्वप्नाली सायकर,सुनीता वाडेकर,अर्चना मुसळे,सहाय्यक आयुक्त संदीप कदम,प्रल्हाद सायकर, मधुकर मुसळे,यांनी पालखीचे स्वागत केले.






Comments
Post a Comment